मदरशात तब्बल दहा मुलांवर ‘ अनैसर्गिक ‘ अत्याचार, मौलवी ताब्यात

Spread the love

देशात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या गुजरातमधील जुनागड परिसरात समोर आलेले असून जुनागड जिल्हा पोलिसांनी सोमवारी एका मदरशाच्या शिक्षकाला आणि 55 वर्षीय एका ट्रस्टीला दहा अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार प्रकरणी अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अनैसर्गिक बलात्कार हे मौलवीने केलेले असून ट्रस्टी यांच्याकडे तक्रार देण्यात आलेली होती मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मौलवी शिक्षकाला सुरतमधून पकडण्यात आलेले तर आहे तर मदरशाच्या ट्रस्टीला जुनागडमधून अटक करण्यात आलेली आहे.

एका सतरा वर्षीय मुलाने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिलेली असून मंगरूळ पोलिसांनी दोन्ही आरोपींना कलम 377 323 506 2 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत बेड्या ठोकलेल्या आहेत. जुनागडचे पोलीस अधीक्षक हर्षल मेहता यांनी त्यानंतर मदरशाचा देखील दौरा केला आणि विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना निपक्ष: तपासाचे आश्वासन देखील दिलेले आहे.


Spread the love