गूढ उलगडलं..लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात ‘ ती ‘ घरी आली अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात समोर आलेले असून प्रेयसीच्या नादात आंधळ्या झालेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपीने प्रेयसीच्या मदतीने हा प्रकार केलेला असून रामटेकजवळील खिंडसी रोडवरील बोरी जंगलात हा प्रकार घडलेला आहे. 18 ऑक्टोबर रोजी आरोपीने स्वतःच्या बायकोचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप केलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , कन्हान पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली होती त्यानंतर रामटेक पोलिसांना मृतदेह आढळला मात्र त्याची ओळख पटत नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास करत अखेर आरोपी छोटूलाल यादव आणि त्याच्या प्रेयसीला अटक केलेली असून मयत महिलेचे नाव दिव्या यादव असे असल्याची माहिती आहे.

छोटूलाल हा शेतमजूर असून वर्षभरापूर्वी त्याची दिव्या ताराम हिच्यासोबत भेट झालेली होती त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध देखील निर्माण झाले आणि अखेर ऑगस्ट महिन्यात त्यांनी लग्न देखील केलेले होते. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत चालू होते मात्र याच दरम्यान छोटूलाल याची दुसरी प्रेयसी घरी आली आणि तिने घरी येऊन चांगलाच गोंधळ निर्माण केला.

पत्नी असलेली दिव्या हिला देखील याप्रकरणी आधी काहीही माहिती नव्हती त्यानंतर दिव्या आणि छोटूलाल यांच्यात वाद वाढू लागले . छोटूलाल याने दुसऱ्या प्रेयसीसोबत देखील लग्नाची तयारी दाखवली होती. 18 ऑक्टोबर रोजी छोटूलाल दिव्या हिला फिरायला म्हणून जंगलात घेऊन गेला त्यावेळी तिथे ठरलेल्या प्लॅन प्रमाणे त्याची प्रेयसीदेखील पोहोचलेली होती.

छोटूलाल आणि त्याचे प्रेयसी या दोघांनी मिळून दिव्या हिचा खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून त्याचे विद्रूपीकरण देखील केले . महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओम प्रकाश कोकाटे यांनी पथकासह घटनास्थळी धावत घेतली त्यानंतर तिथे एक स्कार्फ आणि पितळाची बांगडी सापडलेली होती त्याच्याआधारे अखेर आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले आहे.


Spread the love