मित्रांसोबत विवस्त्र अवस्थेत पार्टी करत घडले ‘ असे काही ‘ की , तरुण म्हणतोय की..

Spread the love

देशात एक वेगळीच घटना उघडकीस आली असून उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एका हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या टेरेसवर रात्री पार्टी सुरु असताना एक तरुणी विवस्त्र अवस्थेत डान्स करत होती मात्र ती अचानक सात माजली इमारतीच्या टेरेसवरून खाली पडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिला रुग्णालयात दाखल केले असून झालेल्या घटनेचा तपास सुरु केला आहे .

पोलिसांनी सांगितले की, सदर चोवीस वर्षीय तरुणी ही मुळची पश्चिम बंगालमधील रहिवासी असून ती हरियाणामधील पानिपत येथे वास्तव्यास होती. ती १२ डिसेंबर रोजी ग्रेटर नोएडामध्ये तिच्या मित्राला भेटण्यासाठी आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ही तरुणी अचानक सातव्या मजल्यावरून अचानक खाली पडली. प्राथमिक तपासामध्ये सदर तरुणी ही झोप आणि नशेत असल्याने खिडकीतून खाली पडली .

सदर तरुणीच्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या रात्री दोघांनीही पार्टी केली होती आणि नशा देखील केलेली होती . मध्यरात्री जेव्हा सदर तरुणी बाथरूममध्ये गेली तेव्हा ती खिडकीमधून खाली पडली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच रुग्णालयामध्ये सदर तरुणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

पोलिसांनी सदर तरुणीच्या नातेवाईकांना सूचना दिली आहे मात्र आतापर्यंत कुणीही सदर तरुणीची चौकशी करण्यासाठी आलेला नाही तर तरुणीच्या मित्राची चौकशी केली असता त्याने सांगितले की, या तरुणीसोबत त्याची भेट नियमितपणे व्हायची. तसेच ती जेव्हा यायची तेव्हा त्याच्याच फ्लॅटमध्ये राहायची


Spread the love