पुण्यात अल्पवयीन मुलीसोबत संसार थाटला , पोलिसांना माहिती समजली अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात समोर आलेले असून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीला पळून नेण्यात आलेले होते . मुलीला पळून नेणारा आरोपी हा मुलीसोबत पुण्यात राहत असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीसह मुलीला ताब्यात घेतलेले आहे. आरोपीवर अत्याचाराचा तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अनिल गोपी किशन खंदारे ( वय 27 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून 12 ऑक्टोबर 2023 रोजी त्याने अल्पवयीन मुलीला पळून पुण्याला पलायन केलेले होते. खंदारे हा लोणी तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील लोणी पाडगाव येथे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि ठाणे प्रमुख विलास हजारे यांना मिळाली त्यानंतर तात्काळ त्यांनी पथकासह तिथे धाव घेतली त्यावेळी अल्पवयीन मुलगी आरोपीसोबत तिथे आढळून आली. मुलीला तिच्या पालकांकडे स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


Spread the love