महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गंभीर होताना दिसून येत असून असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला आहे. मागील भांडणाच्या कारणातून एका व्यक्तीने एका तरुणीच्या मोपेडचा पाठलाग करून रस्त्यातच तिच्या भावी पतीसमोर तिचा हात धरला आणि तिला धक्काबुक्की केली. 23 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास इंडियन हॉटेल समोर ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , जय दाभाडे ( वय 32 राहणार अंबिका नगर मुकुंदवाडी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तरुणी तिच्या भावी पतीसोबत मोपेड वर जात असताना दाभाडे याने तिचा पाठलाग सुरू केला आणि मोपेडला कट मारून तिला शिवीगाळ सुरू केली. होणाऱ्या पतीला देखील त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली असून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .