पत्रकार आहोत सांगत ‘ स्पा ‘ वाल्याकडे मागितली खंडणी , त्यानंतर मात्र..

Spread the love

पत्रकारितेच्या चांगल्या पैशाला काळीमा फासण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून समोर येत आहेत. असाच एक प्रकार सध्या नवी मुंबईत समोर आलेला असून पनवेलमधील एका स्पा चालकाच्या विरोधात पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार कथित पत्रकारांच्या विरोधात पनवेल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , किरण सुरवाडे , संतोष मस्के , विकास झा आणि जाहीद दसाना अशी या कथित पत्रकारांची नावे असून यापूर्वी देखील त्यांनी स्पा चालवणाऱ्या एका व्यक्तीकडून 26 हजार रुपये उकळलेले आहेत. भीमसिंह नाईक असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून आरोपींनी त्यांना तुमच्या स्पामध्ये अल्पवयीन मुलींकडून अनैतिक प्रकार करून घेण्यात येतात असा आरोप करत खंडणी मागितली होती.

तक्रारदार यांनी त्यांना अनेकदा असे कुठलेही प्रकार आपल्याकडे होत नाहीत असे त्यांना सांगितले मात्र त्यानंतर या चौकडीने नवी मुंबईच्या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार देखील केली. पोलिसांनी केलेल्या तपासात देखील असा कुठलाच प्रकार समोर आला नाही मात्र तरीदेखील चारही आरोपी तक्रारदार यांना पैशासाठी त्रास देत होते.

जर तुम्ही पैसे दिले नाही तर वारंवार आम्ही अशाच स्वरूपाच्या तक्रारी देत राहू असे सांगत स्पा चालवणाऱ्या व्यक्तीकडून फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून 26 हजार रुपये खंडणी देखील उकळण्यात आली तरी देखील आरोपींचे समाधान होत नसल्याने हातबल झालेले तक्रारदार यांनी अखेर पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केलेली होती. चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love