पुण्यात माणुसकीची भावना अंगलट , बोलत असताना कारच झाली गायब

Spread the love

पुण्यात एक अजब घटना समोर आलेली असून बाणेर रस्ता इथे संचारभवन परिसरात एका कारचालकाचा एका दुचाकीस्वाराला धक्का लागला. दुचाकी वरील एक मुलगा आणि मुलगी खाली पडले . त्यांना काही लागले आहे का ? म्हणून चालक गाडीतून बाहेर आले मात्र यावेळी काही दुचाकीस्वार तरुणांनी त्यांची कारच पळून नेली. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात यानंतर दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तुषार सुनील कोळेकर ( राहणार लोणी काळभोर ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून तुषार हे एका कारमधून बाणेर रस्त्यावरून जात होते त्यावेळी एका दुचाकी स्वाराला त्यांचा धक्का लागला आणि दुचाकीस्वार मुलगा आणि मुलगी रस्त्यावर खाली पडले.

माणुसकीच्या भावनेने त्यांना काही झाले आहे का ? या काळजीपोटी तुषार गाडीच्या बाहेर आले मात्र याच दरम्यान तुषार यांची कॉलर पकडून खाली पडलेल्या दोन जणांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले आणि त्या साथीदारांनी कोळेकर यांच्या गाडीची चावी घेऊन गाडी पळून नेली. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love