एका तासाला सतरा कॅनडियन डॉलर , टप्प्यात घेऊन पैसे उकळले अन..

Spread the love

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या नवी मुंबईत समोर आलेला असून कॅनडामध्ये तुम्हाला परमनंट रेसिडेंट नोकरी मिळून देतो असे आमिष दाखवत एका भामट्याने आणि त्याच्या बहिणीने एका व्यक्तीकडून नऊ लाख रुपये उकळून फसवणूक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्यालयाचे कार्यालय देखील बंद असून हतबल झालेल्या व्यक्तीने त्यानंतर पोलिसात धाव घेतली.

उपलब्ध माहितीनुसार , जसपाल सिंग ओबेराय आणि राणी कौर रंधवा अशी फसवणूक करणाऱ्या दोन्ही बहीण भावांची नावे असून कळंबोली पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . बलजीत सिंग ( वय 39 ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून ऑगस्ट 2022 मध्ये फेसबुकवर परदेशात नोकरी मिळून देण्यासंदर्भात एक जाहिरात त्यांनी पाहिलेली होती.

बलजीत सिंग हे कॅनडात जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याकारणाने त्यांनी आरोपींना संपर्क केला त्यावेळी आरोपींनी त्यांना आम्ही लोकांना परदेशात नोकरीसाठी पाठवतो. त्यांचे इमिग्रेशन , परमनंट रेसिडेंट तसेच पोर्तुगाल आणि कॅनडा या देशात लेबर पुरवठा देखील करतो असे सांगितले होते. वेअर हाऊस आणि शॉपिंग मॉलमध्ये आणि स्क्रीन जॉबसाठी देखील आम्ही पाठवतो असे देखील त्यांनी म्हटले.

जसपाल सिंग याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बलजीत सिंग यांनी परदेशातील नोकरीसाठी त्यांना टप्प्याटप्प्याने नऊ लाख रुपये दिलेले होते. बलजीत सिंग यांची फोनवरून मुलाखत घेण्याचा बहाना करून आरोपीने त्यानंतर ते मुलाखतमध्ये पास झालेले आहेत असे देखील सांगितले त्यानंतर एका कंपनीचे ऑफर लेटर देखील त्यांना पाठवण्यात आले आणि एका तासाला 17 कॅनडियन डॉलर पगार मिळेल असे देखील सांगण्यात आलेले होते.

मागील जून महिन्यात वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली त्यानंतर बलजीत यांनी नोकरीसाठी आरोपीला संपर्क केला तर त्याचा फोन स्विच ऑफ आढळून आला. हतबल झालेले बलजीत यांनी त्यानंतर कळंबोली येथील कार्यालयात जाऊन चौकशी केली तर कार्यालय बंद होते. जसपाल सिंग यांच्या राहत्या घरी तक्रारदार यांनी धाव घेतली तर तो तिथूनही फरार झालेला होता. कळंबोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love