चक्क सापापासून बनवली जाते दारू , ‘ ह्या ‘ देशात सर्वाधिक मागणी

Spread the love

भारतात दारूचे अनेक प्रकार तळीराम बांधवांना मोठ्या प्रमाणात माहिती आहेत मात्र चीनमध्ये एक अद्भुत दारू बनवली जात असून ही दारू ना साखरेपासून ना धान्यापासून ना फळापासून आणि फुलापासून बनवली जाते तर ही दारू चक्क सापापासून बनवली जाते.

सर्वसाधारणपणे द्राक्षापासून दारू बनवली जाते तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांपासून देखील दारू बनवली जाते. काही फळांपासूनही दारू बनवली जाते मात्र चीनमध्ये चक्क सापापासून दारू बनवली जात असून प्रामुख्याने ही दारू चीन जपान आणि थायलंड या देशात प्रसिद्ध आहे. आगळ्यावेगळ्या खाद्यसंस्कृतीसाठी हे देश तसेही चर्चेत असून चीनमध्ये चक्क कुत्री खाल्ली जातात तर माकडाचा मेंदू देखील चायनीज लोक आवडीने खातात.

सापापासून दारू बनवण्याची पद्धत अत्यंत वेगळी असून जिवंत सापाला दारूने भरलेल्या एका जारमध्ये सोडून वरून झाकून लावून देण्यात येते. सोडून दिलेला साप आतमध्येच मृत्युमुखी पडतो आणि त्यानंतर त्याचे शरीर दारूमध्ये पडून राहते. जोपर्यंत दारूचे जोपर्यंत झाकण उघडले जात नाही तोपर्यंत हा साप दारूतच पडून असतो. मरण्याच्या आधी साप उलटी करतो ती उलटी देखील दारूत मिक्स होते आणि त्यानंतर दारूमध्ये साप सडत जातो मग त्याचे विष देखील नष्ट होते आणि ही दारू त्यानंतर ग्राहकांना दिली जाते. चीनमधील या आगळ्यावेगळ्या दारूबद्दलचे युट्युबवर असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत.


Spread the love