‘ नाजूक क्षण ‘ सुरु असतानाच बेदम मारहाण अन मोबाईल गायब , पुण्यातील प्रकार

Spread the love

पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर एका महिलेने एका तरुणाला भेटायला ये असे सांगत भेटीसाठी बोलावून घेतले आणि त्यानंतर हॉटेलमध्ये बेदम मारहाण करून त्याला लुटलेले आह. खराडी परिसरातील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 25 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना एका हॉटेलमध्ये घडलेली असून घोरपडी गाव परिसरात राहणाऱ्या एका 37 वर्षाच्या व्यक्तीने आरोपी महिलेच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. एका डेटिंग ॲपवर पूजा नावाने ती कार्यरत असल्याचे असल्याने दोघांची मैत्री झालेली होती.

आरोपी महिलेने त्यानंतर तू मला भेटायला ये असे सांगत कुठे भेटायचे कसे भेटायचे त्यावेळी आपण काय काय करणार यासंदर्भात चर्चा केल्यानंतर खराडीतील एक हॉटेल तक्रारदार व्यक्ती यांनी बुक केलेले होते. संबंधित व्यक्ती हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यात ‘ नाजूक क्षण ‘ सुरू असतानाच आरोपी तिथे दाखल झाले आणि त्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली.

त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला आणि तुझ्यावर बलात्काराची केस करेल असे सांगून तक्रारदार व्यक्ती यांच्याकडून वीस हजार रुपये ऑनलाईन लुबाडले. तक्रारदार यांनी आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love