महाराष्ट्रात अवैध सावकारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतलेले असून बुलढाणा जिल्ह्यात प्लॉट घेण्यासाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज परत करण्यात अपयश आले म्हणून सावकाराने त्रास दिल्यानंतर एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . मेहकर पोलिसात 27 ऑक्टोबर रोजी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार , शबाना फिरोज शेख ( वय 37 ) असे मयत महिलेचे नाव असून महिलेचा पती फिरोज शेख वादामिया ( राहणार मेहकर ) यांनी आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीत म्हटलेले आहे की पत्नीने प्लॉट घेण्यासाठी शबाना शेख , रशीद बाबाजान जाफर शेख जाफरखान , रोहन शिंदे आणि साधना गजानन नटाळ यांच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतलेली होती.
आरोपींनी पैशाच्या वसुलीसाठी सातत्याने फोन केले त्यामुळे अखेर मानसिक छळ झाल्याने आपल्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे. 18 ऑक्टोबर रोजी तिने गळफास घेतलेला असून तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र अखेर 27 तारखेला त्याचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी वरील चार आरोपी जबाबदार आहेत असे म्हटलेले आहे.