दोस्ताच्या बायकोच्या खोलीत मध्यरात्री रंगेहाथ सापडला अन.. ,

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नागपूर इथे समोर आलेली असून स्वतःच्या बायकोच्या खोलीत प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर पती आणि त्याच्या दोन साथीदारांनी महिलेच्या प्रियकराचा खून केलेला आहे. इमामवाडा हद्दीत रामबाग रोडजवळ असलेल्या वस्तीत ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नितीन सोहनलाल रोहनबाग ( वय 38 राहणार गंगाबाई घाट ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सदर प्रकरणी गब्बर उर्फ राजेश चव्हाण ( वय 47 राहणार इमामवाडा ), बाबल्या संजय झांजोटे ( वय 33 ) आणि अनिकेत श्रावण झांजोटे ( वय 27 ) अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत.

गब्बर चव्हाण हा शासकीय रुग्णालयात नोकरीला असून त्याला दोन बायका आहेत . दोन्ही पत्नीकडून त्याला दोन दोन मुले असून पहिल्या बायकोला माहीत होऊ न देता त्याने नात्यातील एका तरुणीसोबत लग्न केलेले होते. मयत नितीन रोहनबाग हा गब्बर याचा मित्र असल्याकारणाने त्याचे गब्बर याच्या घरी जाणे येणे होते. दरम्यानच्या काळात त्याचे गब्बरच्या दुसऱ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध जुळले.

आरोपी गब्बर हा याचे दुसऱ्या पत्नीसोबत मतभेद झाल्यानंतर पंधरा दिवसांपासून तो पहिल्या पत्नीच्या खोलीवर राहायला गेलेला होता याच दरम्यान नितीन हा तिच्या घरी येऊ लागला त्यानंतर रात्रीच्या सुमारास दोघेही शारीरिक संबंध ठेवत असायचे या प्रकाराची कुणकुण गब्बर याला लागलेली होती त्यामुळे त्याने पाळत ठेवणे सुरू केले.

मध्यरात्रीच्या सुमारास नितीन हा गब्बर याच्या दुसऱ्या बायकोच्या खोलीवर असल्याची माहिती समजताच गब्बर इतर आरोपींना घेऊन तिथे गेला आणि मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नको त्या अवस्थेत गब्बर याची बायको नितीनसोबत त्याला दिसून आली. त्यानंतर तिघांनी चाकूने वार करत नितीन याला जागीच ठार केले. नितीनची दुसरी पत्नी माधुरीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love