नात्याला काळिमा..नराधम आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या डोंबिवली इथे समोर आलेले असून डोंबिवली ग्रामीण भागात काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारा एक प्रकार समोर आलेला आहे. एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती सावत्र वडिलांच्या भावाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी नराधम काकाला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , डोंबिवली पूर्व येथील ही घटना असून पीडित 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर होती आणि गेल्या वर्षभरापासून त्याने तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार करायला सुरू केलेले होते.

सदर प्रकार जर तू कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी तो देत असायचा . सातत्याने त्याचा असा त्रास होत असल्याने अखेर पीडित मुलीने आपल्या आईला या संदर्भात माहिती दिली आणि तिने मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तात्काळ नराधमाला अटक केलेली आहे.


Spread the love