महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथे समोर आलेली असून बायकोसोबत सतत होत असलेल्या वादाला कंटाळून धारदार शस्त्राने पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे . 31 ऑक्टोबर रोजी दहाच्या सुमारास टेकाळे गावात ही घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दुलेश्वरी उर्फ कुसुम अमित भोयर ( वय 28 ) असे मयत पत्नीचे नाव असून आरोपी अमित नारायण भोयर याने त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले . विशेष म्हणजे त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. लग्नानंतर कुटुंब सर्व काही व्यवस्थित सुरू असताना पती-पत्नीत शुल्लक कारणावरून वादाला सुरुवात झाली त्यामुळे अमित मानसिक त्रासाला कंटाळलेला होता.
घटना घडली त्या दिवशी वाद टोकाला गेला आणि त्याने चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करत तिचा खून केला. आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ कन्नड पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर पत्नीचा खून केल्याची कबुली दिली . पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले मात्र तोपर्यंत त्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला होता.
दुसरीकडे कुसुम हिच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार , अमित तिला पैशांसाठी त्रास द्यायचा अशी तक्रार नोंदवलेली आहे. नवीन पिकअप वाहन घेण्यासाठी तिने याआधी देखील पैसे नेलेले होते मात्र तरी देखील आरोपी आणखीन पैसे मागायचा म्हणून त्यांच्यात वाद होता असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे.