‘ उतावळी ‘ नवरी पाहून लग्नही उरकलं , डॉक्टरवर पश्चातापाची वेळ

Spread the love

सोशल मीडियावर मैत्रीचे आणि फसवणुकीचे प्रकार वाढलेले असून असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातील आग्रा इथे समोर आलेला आहे. आग्रा येथील एका डॉक्टरने विवाहविषयक संकेतस्थळाची मदत घेतली मात्र त्यानंतर त्याच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शहागंज येथील डॉक्टरची या संकेतस्थळावर शिक्षिका आणि वकील असल्याची बतावणी करणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. फिर्यादी गाजियाबाद इथे लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले मात्र तिथे त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना लग्न करण्यास भाग पाडण्यात आले . लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची डिमांड केली आणि नकार दिल्यानंतर पतीसह पहिल्या पत्नीच्या मुलाला त्रास देण्यास तिने सुरू केले.

लग्नाला महिना होण्याच्या आतच तिने संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली आणि शिवीगाळ करत पतीला मारहाण देखील तिने सुरू केली. छतावरून फिर्यादी यांच्या डोक्यावर तिने कुंडी फेकली मात्र त्यात त्यांचा जीव थोडक्यात बचावला. आरोपी पत्नीने आपल्यावर चाकूने हल्ला देखील केलेला आहे असे देखील फिर्यादी यांचे म्हणणे असून पत्नीचा भाऊ पोलिसात आहे याची देखील ती धमकी देत असायची.

फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार पत्नीपासून बचाव व्हावा म्हणून आपण सीसीटीव्ही कॅमेरे देखील घरात लावले मात्र तिने ते देखील फोडून टाकले. सहा ऑक्टोबर रोजी दागिने आणि दोन लाख रुपये घेऊन ती घरातून पळून गेली. 16 ऑक्टोबर रोजी ती पुन्हा आली त्यावेळी हॉस्पिटलचे ताळे तोडले आणि डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पासबुक चेकबुक सर्व काही घेऊन निघून गेली. पोलीस सध्या तपास करत असल्याची माहिती आहे.


Spread the love