अत्यंत गुंतागुंतीच्या मर्डर केसचा पर्दाफाश , गिटार टीचर गायब झाला अन..

Spread the love

महाराष्ट्रात सध्या एका खळबळजनक अशा हत्याकांडाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलेले असून मुंबई पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे. मुंबईच्या माहीम समुद्रकिनारी एक सुटकेस पाण्यावर तरंगताना आढळून आली होती. पोलिसांनी तिथे धाव घेतली त्यावेळी त्या सुटकेसमध्ये एका पुरुषाचा मृतदेह होता मात्र केवळ दोन हात आणि दोन पाय त्यामध्ये कापून टाकले होते आणि सुटकेसमध्ये काही कपडे होते फक्त इतक्याशा पुराव्यावरून पोलीस अखेर आरोपीपर्यंत पोहोचलेले आहे.

माहीम समुद्रकिनाऱ्यावर हा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना प्रथमदर्शनी हा मृतदेह एका पुरुषाचा आहे इतकीच माहिती हाती लागलेली होती मात्र तिथे सुटकेसमध्ये एक शर्ट सापडून आला त्यामध्ये एका टेलर शर्टावर टेलरचा टॅग लावलेला होता. टेलरचे नाव लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली मात्र टेलरला शर्ट कुणाचा आहे याची फारशी माहिती नव्हती.

दुसरीकडे पोलिसांनी गायब झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती त्यानंतर 26 नोव्हेंबर 2019 रोजी परिसरातील बेनेट नावाचा व्यक्ती गायब असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यानंतर बेनेट नावाच्या व्यक्तींची फेसबुकवर माहिती घेण्यास सुरू केले त्यावेळी मयत व्यक्तीच्या अंगावर ज्या पद्धतीचा स्वेटर होता अशाच पद्धतीचा स्वेटर घातलेली एक व्यक्ती आढळून आली म्हणून पोलीस त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी त्याच्या घराला कुलूप होते . बेनेट म्युझिक टीचर होता आणि गिटार शिकवायचा .पोलिसांनी अखेर त्याच्या घराचे कुलूप तोडले आणि त्याच्या मुलीच्या खोलीची झडती घेतली तेव्हा तिथे एक चिठ्ठी लिहिलेली आढळून आली.

बेनेट यांच्या मुलीने ही चिठ्ठी लिहिलेली होती त्यामध्ये ‘ डॅडी मला माफ करा मी तुमची मुलगी असूनही मी तुमची हत्या केली . तुम्ही माझं संगोपन केलं पण मी तुमची हत्या केली ‘ असे लिहिलेले होते . पोलिसांना हत्येचा उद्देश जाणून घ्यायचा होता म्हणून अखेर पोलीस मुलीपर्यंत पोलीस पोहोचले त्यावेळी तिने मी वडिलांची हत्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून केली ‘ असे म्हटलेले आहे .

बेनेट याने मुलगी रिया हिला दत्तक घेतले होते आणि त्यानंतर तिचे तो लैंगिक शोषण करत होता . दत्तक बापाकडून सुटका मिळावी म्हणून तिने हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि कठीण अशा केसचा पोलिसांनी हा पर्दाफाश केलेला आहे. रिया आणि तिचा बॉयफ्रेंड यांनी बेनेट यांच्या डोक्यावर घाव घालून त्यांचा खून केलेला होता. त्यांच्या तोंडात झुरूळ मारण्याचे औषध ओतले आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये घालून त्यांनी फेकून दिलेले होते. मृतदेहाचे धड आणि शीर त्यांनी इतरत्र फेकून दिले आणि हात आणि पायांतून रक्तस्राव होऊ नये म्हणून कपड्याने गुंडाळून रक्तस्राव रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता मात्र इथेच ते अखेर अडकले.


Spread the love