देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील बदायू इथे समोर आलेले असून एका महिलेचे तिच्या दीरासोबत प्रेमसंबंध होते. अल्पवयीन दीर आणि ही महिला एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले मात्र अखेर महिलेच्या पतीने त्यांना रंगेहात पकडले त्यानंतर पतीने नात्याचा अत्यंत भयानक शेवट केलेला आहे.
बदायूमधील बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदगंज गावात हे प्रकरण घडलेले असून एक विवाहित महिला आणि तिचा सोळा वर्षांचा दिर यांच्यात अनैतिक संबंध सुरू झालेले होते. पती घराबाहेर गेला की वहिनी दिराला बोलावून घ्यायची आणि तिच्याच खोलीमध्ये त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. एके दिवशी पतीने त्यांना रंगेहात पकडले . समजावून देखील फरक होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाली आणि त्यातून पतीने अखेर सोळा वर्षाच्या स्वतःच्या भावाचा खून केला.
अहमदगंजच्या शेतामध्ये सोळा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यात आली त्यानंतर कुटुंबाची चौकशी करताना 23 ऑक्टोबर रोजी तो बेपत्ता झालेला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली त्यावेळी त्याच्या भावावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेले होते. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर त्याला बोलते करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सांगितले की , ‘ 23 ऑक्टोबर रोजी भावाला औषध देण्याच्या बहाण्याने परोली इथे तो घेऊन गेलेला होता. तिथे निर्जन जागा पाहून दोन्ही भावांनी सोबत गांजा ओढला आणि त्यानंतर लहान भावाचा आरोपीने खून केला. आपल्या पत्नीसोबत तो शारीरिक संबंध ठेवत असायचा त्यातून ही हत्या केल्याचे त्याच्या भावाने सांगितलेले आहे.