मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात टोकाचे पाऊल , कुटुंबीय म्हणतात की..

Spread the love

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 डिसेंबरची मुदत देण्यात आलेली असून आरक्षण मिळवण्यासाठी आत्तापर्यंत अनेक मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचललेले आहे. पुन्हा एकदा अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी इथे समोर आलेले असून आळंदी परिसरातील चिंबळी येथे एका बावीस वर्षीय तरुणाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सिद्धेश सत्यवान बर्गे ( वय 22 वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे . सिद्धेश हा गॅस रिपेरिंगचा व्यवसाय करत असायचा. आळंदी परिसरात त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आणि त्याच्याजवळ एक सुसाईड नोट देखील आढळून आलेली आहे.

सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले आहे की , ‘ मी माझा जीव कुणाच्या त्रासाला वैतागून कंटाळून देत नाही तर सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून देत आहे . मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे म्हणून मी माझा जीव देत आहे. कोणीही कुणाला दोष देऊ नये मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे माझा सोन्या आप्पा जीजी आणि आई यांना सांभाळा ‘, असे देखील त्याने म्हटलेले आहे.

शुक्रवारी त्या रात्री त्याने दुकानाचे शटर बंद केले आणि त्यानंतर हा प्रकार केला . गेल्या अनेक वर्षांपासून तो मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेला होता. कुटुंबीयांनी यानंतर माध्यमांशी बोलताना आमच्या मुलाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केलेले असून आम्हाला मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. कुणीही असे टोकाचे पाऊल भविष्यात उचलू नये असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे.


Spread the love