तैवानचं पार्सल आलंय तुमच्या नावाने , पुण्यातील तरुणाला फोन आला अन..

Spread the love

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलेला असून पुन्हा एकदा फसवणुकीचा एक अजब प्रकार पुण्यात समोर आलेला आहे . तुमच्या नावाने मुंबईतून तैवानला एक पार्सल पाठवले जात आहे त्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलेले आहे असे सांगत क्रेडिट कार्डवर लोन घेण्यास भाग पाडले आणि दहा लाख रुपयांची सायबर चोरटयांनी त्यांनी फसवणूक केली . 21 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे.

सदर प्रकरणी क्षितिज जगदीशचंद्र तिवारी ( वय 36 वर्ष राहणार शेवाळवाडी हडपसर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून एक मोबाईल धारक सोशल मीडियावरील एक प्रोफाइल धारक आणि पंजाब नॅशनल बँकेचा खातेदार असलेला एक वेळेस इसम यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मी क्षितिज यांना अज्ञात व्यक्तीने 21 सप्टेंबर रोजी संपर्क साधला आणि नार्कोटिक्स विभागातून आपण बोलत आहे असे सांगितले. तैवानला पाठवण्याच्या उद्देशाने एक पाकीट आलेले असून त्यामध्ये ड्रग्स आहेत अशी बतावणी करण्यात आली . आरोपींनी त्यानंतर फिर्यादी यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्यानंतर क्रेडिट कार्डवर लोन घेण्यास भाग पाडले आणि पैशाचा चेक तयार करायचा आहे असा बहाणा केला. आरोपीने क्षितिजला त्याच्या बँक खात्यावर दहा लाख रुपये पाठवतो असे सांगत फसवणूक केली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे .


Spread the love