देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून बिहारच्या पश्चिम चंपारण येथील ही घटना आहे . एक प्रियकर प्रेयसीचा भाऊ म्हणून तिच्या सासरी गेला आणि त्यानंतर निकाहचे सर्व विधी पार पडल्यानंतर नवऱ्या मुलीसोबत झोपण्याचा आग्रह तो करू लागला. सासरच्या लोकांना विचित्र वाटलं मात्र त्यांनी भाऊ आहे म्हणून दुर्लक्ष केले मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची सुहागरात सुरू असतानाच सासरच्या मंडळींनी त्यांना पकडले.
उपलब्ध माहितीनुसार , 30 ऑक्टोबर रोजी अमवा मंजर इथून मुलीची वरात निघाली आणि कुंजलाही गावात पोहोचलेली होती . शेखावत हवारी यांचा मुलगा मुस्ताक हवारी असे नववधूच्या नवऱ्याचे नाव आहे. नववधूसोबत अंगूर हवारी हा तिचा प्रियकर देखील नवरीचा भाऊ म्हणून सहभागी झालेला होता .
मोठ्या थाटामाटात निकाह पार पडला आणि त्यानंतर सुहागरात्रीच्या दिवशी अंगूर याने नववधूच्या खोलीमध्ये झोपण्याचा आग्रह केला. पहिलीच रात्र असल्याकारणाने पतीने देखील भाऊ आहे या विश्वासाने त्याला परवानगी दिली मात्र रात्रीच्या सुमारास दरवाजा उघडला त्यावेळी नववधू आणि त्याच्यात नको तो प्रकार सुरू असताना सासरच्या व्यक्तींना दिसला. न्यूज नेशनने या संदर्भात वृत्त दिलेले आहे.
सासरच्या व्यक्तींनी त्यानंतर अंगूर याची जोरदार पिटाई केली आणि त्यानंतर नववधूला पुन्हा पाठवण्यासाठी तिच्या माहेरी फोन केला. नवरीने याप्रकरणी बोलताना आपल्याला हे लग्न मुळातच मान्य नव्हते मात्र कुटुंबांच्या दबावामुळे आपण हे लग्न केले असे सांगितलेले असून पतीसोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यानंतर या नववधूला पुन्हा तिच्या माहेरी पाठवून देण्यात आलेले आहे.