गूढ उलगडलं.. ‘ मास्टरमाइंड ‘ बायकोच निघाली कारण इतके वेगळे की..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशात गाजीपुर इथे समोर आलेले असून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. गाजीपुरच्या खानपुर पोलीस स्टेशन हद्दीजवळ ही घटना घडलेली असून पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे.एसपी ओमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली कारण तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध करण्यात आलेले होते.

29 सप्टेंबर रोजी मोबाईल विक्रेता असलेला स्वतंत्र भारती या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. सदर प्रकरणी त्यांची पत्नी कांचन गिरी हिच्यावर संशय होता म्हणून तिला ताब्यात घेण्यात आले . त्यावेळी तिने आपले विरू नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते मात्र तरीदेखील कुटुंबाच्या दबावातून आपले लग्न स्वतंत्र यांच्यासोबत लावण्यात आले त्यामुळे आपण खुश नव्हतो असे म्हटलेले आहे. लग्नानंतर ती वीरू आणि त्याच्या मित्रांशी संपर्कात होती अशी ही माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे.

कांचन हिने कबुली देताना घटना घडली त्यादिवशी स्वतंत्र यांनी दुकान बंद केले मात्र घरी जात असताना वीरू त्याचे दोन मित्र गोविंद यादव आणि गामाबिंद या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी कांचन हिच्यासोबत तिच्या तीनही मित्रांना अटक केलेली असून घटनेत वापरलेली हिरो होंडा शाईन गाडी , दुचाकी , पिस्तूल आणि गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.


Spread the love