पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून जनावरांच्या खाद्यासोबत चक्क भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आलेला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणात दोन जणांना अटक केलेली आहे . त्यांच्याकडून एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून बंगलोर मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विजय चंद्रकांत चव्हाण ( वय 53 राहणार सातारा ) आणि सचिन निवास धोत्रे ( वय 31 राहणार सांगली ) अशी दोन आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांना मावळ न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
बंगळूर मुंबई महामार्गावरून विदेशी मद्याची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रावत गावच्या हद्दीतील हॉटेल हेमराज समोर सापळा रचलेला होता. दुपारी चारच्या सुमारास भारत बेंज कंपनीचे एक चार चाकी वाहन तिथे आले त्यावेळी त्यामध्ये 50 किलो वजनाचे जनावराचे खाद्य भरलेली ८० पोती होती आणि व त्यांच्या खाली गोव्यातून बनवलेली आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या दारूचे बॉक्स आढळून आले.
कारवाईमध्ये अनेक नामांकित ब्रँडच्या बाटल्या आणि टिन आढळून आलेले असून जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत एक कोटी एकोणीस लाख रुपये असल्याचे समजते. पुण्यात याआधी देखील मद्याची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. कोट्यावधी रुपयांची विदेशी दारू पुण्यात आढळून आल्यानंतर परिसरातील हॉटेल चालकांनी देखील याचा धसका घेतलेला आहे .