मुलाची दारूची मागणी , आईने नकार दिला अन त्यानंतर…

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेला असून दारू पिण्यासाठी मुलाने पैसे मागितले मात्र नकार दिल्यानंतर त्याने आईचा चक्क खून केलेला आहे. कागल तालुक्यातील वंदूर येथे वाईंगडे मळ्यात गुरुवारी दोन तारखेला सकाळी हा प्रकार घडलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , सुनिता अशोक वाईंगडे ( वय 51 ) असे मयत आईचे नाव असून निलेश वाईंगडे असे व्यसनी मुलाचे नाव आहे. सदर प्रकरणी आनंदा धोंडीराम वाईंगडे यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी निलेश याला अटक केलेली आहे.

निलेश हा अविवाहित असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतो. आई सुनीता आणि मुलगा निलेश हे दोघेच घरामध्ये राहत होते आरोपी निलेश हा रोज दारू पिऊन घरात यायचा त्यावरून त्यांच्यात वाद देखील होत होते. घटना घडली त्यादिवशी निलेश दारूच्या नशेत होता. त्याने आईने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आपण तिचा खून केला याची कबुली दिलेली आहे.

अज्ञात व्यक्तीने त्यानंतर कागल पोलिसांना फोन करून या प्रकरणी माहिती दिली आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी , कागल पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक रवींद्र गच्चे यांनी घटनास्थळी पोहोचवून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.


Spread the love