देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली असून नृत्य शिकवण्याच्या नावाखाली निष्पाप मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका डान्स टीचरला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आपल्याकडे डान्स शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवून तो चक्क त्यांना ब्लॅकमेल करत मुलीच्या आईकडून पैशाची मागणी करत होता आणि घाबरून मुली देखील त्याला पैसे देत होत्या.
उपलब्ध माहितीनुसार , बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याची तक्रार आईने पोलिसात तक्रार केली असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या डान्स टीचर आर्यन सोनी उर्फ हिमांशू सोनी याला गोविंद नगरचे पोलीस निरीक्षक रोहित तिवारी यांनी अटक केली.
दाबौली येथील अर्बन डान्स अॅकॅडमीच्या नावाने आरोपी आर्यन सोनी हा चार वर्षांपासून डान्स क्लासेस चालवत असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत त्याने याच पद्धतीने डान्स शिकण्यास येणाऱ्या तीन मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे . पीडित मुलींचे त्याने अश्लील व्हिडीओ बनवले होते आणि त्याचा आधार घेत तो मुलींकडे पैशाची मागणी करत होता.
एका मुलीच्या आईच्या अकाऊंटमधून अचानक पैसे गायब होत असल्याने मुलीच्या आईने तक्रार केली असता सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरु केला होता तेव्हा हे पैसे आरोपीच्या अकाउंट मध्ये गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मुलींना विश्वासात घेऊन विचारले असताना हा प्रकार उघडकीस आला . पीडित मुलींची नावे गुप्त ठेवण्यात आली असून आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये ३७६, ३७७, ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे