पुण्यात रंगकामाला आलेल्या पेंटरने लावला चुना , फिर्यादी महिला पोलिसात

Spread the love

पुण्यात एक अजब प्रकार समोर आलेला असून सध्या दिवाळी असल्याकारणाने घरी रंग देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने प्रत्यक्षात मात्र दोन लाख 78 हजार रुपयांना मालकाला चुना लावलेला आहे . आरोपी कामगार याने घरातील दोन लाख 78 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने गायब केलेले असून फुरसुंगी परिसरातील ही घटना आहे.

सदर प्रकरणी एका तीस वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . दोन नोव्हेंबर रोजी दुपारी भोसले व्हिलेज इथे ही घटना घडलेली असून दिवाळी असल्या कारणाने घराला रंग देण्यासाठी हा पेंटर आलेला होता.

फिर्यादी व्यक्ती यांनी आपल्या घराचे काम आरोपीला दिलेले होते मात्र पीओपीला बल्ब लावण्यासाठी केलेल्या कव्हरमध्ये दोन लाख 78 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांनी ठेवलेले होते . हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीने चोरी केली असे महिलेचे म्हणणे आहे . सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिलेली असून पोलीस अंमलदार करपे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत .


Spread the love