दुर्दैवी..पोलीस दारात दिसताच महिलेने सोडला जीव , नगरमधील घटना

Spread the love

‘ पोलीस आपल्या घरी आलेत ‘ या कल्पनेने अनेक नागरिकांना आधार वाटण्याऐवजी भीती वाटते हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. अशीच एक घटना श्रीरामपूर येथे उघडकीस आली असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर जवळील गायकवाड वस्ती येथे पोलीस आलेले आहेत आणि ते आपल्या मुलाला घेऊन जाणार हे दिसताच एका महिलेला भोवळ येऊन ती कोसळली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

उपलब्ध माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळील गायकवाड वस्ती येथे हा प्रकार घडलेला असून गुरुवारी 23 तारखेला सकाळी विठाबाई काकडे ( वय 75 ) या महिलेला मुलाला ताब्यात घेण्यासाठी पोलिस आले याची बातमी समजताच भोवळ येऊन त्या पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत

नाऊर येथील एका भंगार चोरीच्या प्रकरणात तालुका पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून गायकवाड वस्ती येथे एका तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले होते, मात्र दारात पोलिस आलेले पाहून तरुणाची आई जागेवरच कोसळली. पोलिसांनी त्यानंतर त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी म्हटले आहे की, महिलेचे कुटुंबीय शवविच्छेदन न करताच मृतदेह ताब्यात घेऊ इच्छित होते. भंगार चोरीच्या एका गुन्ह्यांमध्ये मयत महिलेच्या मुलाची मालमोटार गाडी वापर केल्याचे तपासात आम्हाला समजले होते म्हणून आम्ही त्याला ताब्यात घ्यायला गेलो होतो, मात्र महिलेच्या मृत्यूमुळे आम्हाला त्याला ताब्यात घेता आले नाही त्यामुळे पुढील कार्यवाही नंतर करण्यात येणार आहे.


Spread the love