घरात घुसून महिलेवर बलात्कार , ‘ डीएनए ‘ रिपोर्ट आला अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती. छत्रपती संभाजीनगर इथे घरात घुसून एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तब्बल दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे . जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी गुरुवारी नऊ तारखेला हा निर्णय सुनावलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिला ही मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवत असून 15 जुलै 2015 रोजी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान पीडित महिला ही आपल्या पाच वर्षीय मुलासह घरी होती त्यावेळी आरोपी प्रवीण उर्फ पऱ्या साबळे हा तिथे आला . आरोपी तिथे त्याचा मित्र राहुल खाजेकर आणि गणेश फुलपगारे या दोघांना घेऊन आला.

आरोपीने त्यानंतर पीडित महिलेवर अत्याचार केला . अत्याचार सुरू असताना गणेश फुलपगारे हा मोबाईल मध्ये शूटिंग करत होता तर राहुल खाजेकर हा त्याला मदत करत होता . सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आर्यस पाडवी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पीडित महिला , तिचा मुलगा आणि डीएनए रिपोर्ट या प्रकरणात महत्त्वाचे ठरले . दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि साक्षी पुराव्यावरून न्यायालयाने आरोपी पऱ्या साबळे याला दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे.


Spread the love