महाराष्ट्रात एक अजब प्रकार समोर आलेला असून जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अमुक तारखेला मी अमुक ठिकाणी आत्महत्या करणार आहे असे त्यात लिहिलेले होते त्यानंतर संबंधित पत्र पोलीस ठाण्याला पाठवण्यात आले आणि पोलिसांनी तात्काळ त्या कार्यालयाच्या दारात पोलिस बंदोबस्त देखील तैनात केला मात्र त्यानंतर तपासात ज्या नावाने हे पत्र दिलेले आहे त्या नावाचा व्यक्ती त्या गावात आढळून आला नाही.
उपलब्ध माहितीनुसार , कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बरकी नावाच्या गावातील संजय चौगुले नावाच्या एका इसमाने जिल्हा परिषदेत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. गट क मधील कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहेत अशी त्यांची तक्रार होती.
सदर प्रकरणी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्याला याप्रकरणी कळविण्यात आले आणि ज्यावेळी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता त्यावेळी अग्निशामक विभागाचा बंब तिथे तीन कर्मचाऱ्यांचा दाखल झाला सोबत तीन पोलीस देखील दाखल झाले मात्र दुपारी दोननंतर बरकी नावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून अशा नावाचा ही इसम आमच्या गावात नाही ही माहिती समोर आली मात्र सदर व्यक्तीने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडवलेली होती.