शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पुणे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातील संगणक प्रणालीत पासवर्डचा गैरवापर करून जन्मदाखल्यातील नावात बदल करण्याचा प्रकार शुक्रवारी 11 तारखेला समोर आलेला आहे. महापालिकेकडून याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे
उपलब्ध माहितीनुसार , कसबा पेठेतील महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातील अधिकारी डॉक्टर अरविंद मखर यांनी फरसखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजाता माने यांच्या पासवर्डचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने जन्मदाखल्यामध्ये चक्क वेदांत मोहन गुप्ता या ऐवजी मोहम्मद असे नाव बदललेले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर फरासखाना पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे .