देशाला स्वातंत्र्य मिळवून कित्येक वर्ष झाली मात्र तरी देखील नागरिकांच्या मनावरील अंधश्रद्धेचा पगडा काही कमी होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असाच एक प्रकार समोर आलेला असून बोरवडे गावच्या हद्दीत उजव्या कालव्याच्या बाजूवरील डोंगरावर अज्ञात व्यक्तींनी दगड एकत्र करून आघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शेतकरी बांधवांनी याप्रकरणी या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , निपाणी देवगड राज्य महामार्गावरील बोरवडे गावाच्या दक्षिणेला काळम्मावाडी प्रकल्पाचा उजवा कालवा आहे. त्याच्या वरच्या बाजूला डोंगर भाग असून पठारावर काही गवत कापणीचे काम सुरू असून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काही दगड मांडून त्यावर शेंदूर फासल्याचे दिसून आले. दगडावर भगव्या रंगाचे कापड , फुलाचा हार , आजूबाजूला हळदीकुंकू आढळून आल्यानंतर हा भानामतीचा प्रकार असल्याचा संशय आला त्यामुळे शेतकरी मजूर देखील त्या ठिकाणी जाण्यास घाबरत आहेत म्हणून शेतीचे कामे ठप्प झाले आहेत त्यामुळे पोलिसांनी तात्काळ अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा तपास करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे .