महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून दिवसभर दारू पिऊन रात्री घरी आल्यानंतर बायकोने स्वयंपाक बनवलेला नव्हता म्हणून रागाच्या भरात तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून प्रहार करत तिचा खून केल्याचा प्रकार पैठण तालुक्यातील हर्षी इथे ऐन दिवाळीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास घडलेला आहे.
सदर प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केलेली असून मयत महिला यांचे नाव प्रियंका श्रीराम वाघ ( वय तीस वर्ष ) असे समजते. आरोपी श्रीराम वाघ हा सेंट्रींगचे काम करायचा मात्र काही दिवसांपूर्वी दारूच्या नादात त्याने ते काम सोडून दिले आणि पत्नी सोबत रोज भांडण करत असायचा. एकीकडे लक्ष्मीपूजन सुरू असताना तो दारू पिऊन आला म्हणून प्रियंकाने माहेरी फोन केला आणि आज देखील नवरा दारू पिऊन आलेला आहे याची माहिती माहेरच्या व्यक्तींना दिली.
सदर दांपत्याला दोन मुले असून दोन आपत्य असून दिवाळीसाठी आपत्ये माहेरी गेलेली होती म्हणून प्रियंकाने रात्री स्वयंपाक केलेला नव्हता. दिवसभर बाहेरून हुंदडून संध्याकाळी आठ वाजता नवरा दारू पिऊन आला त्यावेळी त्याला घरात स्वयंपाक नसल्याचे लक्षात आले म्हणून वाद सुरू झाल्यानंतर त्याने प्रियंका हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला त्यात तिचा मृत्यू झाला.
आरोपीने दारूच्या नशेत त्यानंतर तिचा मृतदेह एका मित्राच्या गाडीत टाकून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेला आणि आपली पत्नी दुसऱ्या मजल्यावरून पडलेली आहे असे सांगितले मात्र त्याच्या बोलण्यावर शंका आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबासाहेब घुगे यांनी पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र त्याने अखेर खुनाची कबुली दिलेली असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केलेली आहे.