दिवाळीतच टोकाचे पाऊल , हातावर ‘ किशोर ‘ गोंदलेले अद्याप ओळख पटेना

Spread the love

एकीकडे संपूर्ण देशात दिवाळीचा उत्सव सुरू असताना दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून उडी टाकून एका महिलेने आत्महत्या केली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि मच्छीमार बांधवांनी त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवलेला आहे. अद्यापपर्यंत महिलेची ओळख पटलेली नाही.

दिवाळीच्या दिवशी रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वाशी खाडी पुलावर ही महिला गेलेली होती त्यानंतर तिने खाडीत उडी घेतली. प्रवास करणाऱ्या काही वाहन चालकांनी याबाबत वाशी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमार बांधव यांच्या मदतीने महिलेचा शोध घेण्यात आला मात्र अखेर तिचा मृतदेहच आढळून आला.

वाशी पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन महापालिकेच्या रुग्णालयात पाठवलेला असून मयत महिलेचे वय अंदाजे पन्नास वर्षे आहे. तिच्या गळ्यात हिरवट काळसर रंगाचा गाऊन असून तिच्या गळ्यात मंगळसूत्र देखील आहे. महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत किशोर असे गोंदलेले असून उजव्या हाताच्या मनगटावर फुलासारखी नक्षी आहे . सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती असेल तर वाशी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत मारोडे यांनी केलेले आहे.


Spread the love