देशात पुन्हा सामूहिक हत्याकांड , बारा वर्षाच्या मुलालाही नाही सोडलं

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना कर्नाटकमध्ये समोर आलेली असून उडुपी शहरात ऐन दिवाळीच्या सुमारास बारा वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आलेली आहे. घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून संशयित व्यक्ती मात्र फरार झालेला आहे.

उडूपीतील तृप्ती नगर जवळील एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. बारा वर्षांचा मुलगा आरडाओरडा ऐकल्यानंतर खोलीत शिरला त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला देखील ठार मारले . शेजारच्या एका मुलीने पोलिसांना माहिती देताना , त्यावेळी झालेला गोंधळ पाहून ती बाहेर आली होती मात्र संशयित आरोपींनी तिला सुद्धा धमकावले असे म्हटलेले आहे.

मयत व्यक्तींमध्ये 46 वर्षांची हसीना , 23 वर्षांचा मुलगा अफगाणी , 21 वर्षांचा आहेनाच आणि एक बारा वर्षांचा मुलगा आहे . याच घटनेत चाकूने जखमी झालेल्या हसीना यांच्या सासूवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

उडुपीचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार यांनी पत्रकारांना माहिती देताना , ‘ चार जणांची हत्या करण्यात आलेली असून एक महिला गंभीर जखमी आहे . हसीना आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेली आहे. आम्ही घटनास्थळी भेट दिलेली असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले असून प्रवीण चौगुले असे त्याचे नाव आहे ‘ असे त्यांनी सांगितलेले आहे .


Spread the love