निवृत्त जवानाच्या आयुष्यात आली अन ‘ जीव ‘ घेऊन गेली , पोलिसही सहभागी असल्याचा आरोप

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून ज्यांच्याकडे पैसे दिसत आहेत अशा नागरिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून फसवणुकीचे प्रकार वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यात समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बळी ठरलेल्या एका निवृत्त जवानाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेले असून महिलेसोबत एक पोलीस अधिकारी देखील यात सहभागी असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यात एका निवृत्त जवानाने आत्महत्या केली होती त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये एक महिला त्याला हनी ट्रॅप वरून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली . निवृत्त जवानाचा मृतदेह बुधवारी जिल्ह्यातील एका तलावात आढळून आलेला होता. संदेश असे या व्यक्तीचे नाव आहे.

संदेश यांनी सुसाईड नोटमध्ये , ‘ जीविता नावाची एक महिला आणि सतीश नावाचा एक पोलीस अधिकारी हे मला त्रास देत होते. दोघांनी मला ब्लॅकमेल करून माझ्याकडे सतत रक्कम मागितली . सैन्य दलाकडून आपल्याला 50 लाख रुपये मिळणार होते या रकमेवर आरोपींची नजर होती ‘, मात्र त्यांचा त्रास असह्य झाल्याने संदेश यांनी अखेर हा प्रकार स्वतःच्या पत्नीला सांगितला आणि त्यानंतर तलावात उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी त्यांची सुसाईड मिळून आलेली असून संदेश यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली आहे.

संदेश यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार सदर प्रकार करण्याआधी त्यांनी सर्व गोष्टी पत्नीला सांगितलेल्या होत्या आणि आपल्याला ब्लॅकमेल होत असल्याची देखील माहिती दिली होती. आरोपी महिलेने संदेश आणि तिचे काही खाजगी क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्याच्या आधारे एका पोलिस अधिकाऱ्याला हाती धरत ही महिला संदेश यांच्याकडून पैशाची मागणी करत होती. तब्बल पन्नास लाख रुपये संदेश यांना मिळणार असल्याकारणाने या पैशावर महिलेचा डोळा होता . आहे ते सर्व या महिलेला दिले तर आपल्या कुटुंबासाठी काहीच राहणार नाही अशा परिस्थितीत करायचे काय ? या चिंतेत संदेश होते त्यातून त्यांनी हा प्रकार केला असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.


Spread the love