खराडीतील तरुण आला टोळक्याच्या जाळ्यात , सांगितलं की तुम्ही फक्त..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून गुगल मॅपवर रेटिंग देण्याचा जॉब आहे असा बहाना करत एका इंजिनीयर तरुणाची फसवणूक करण्यात आलेली आहे. मे महिन्यात हा प्रकार घडलेला असून चंदननगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार हा खराडी परिसरात रहायला असून त्याचे वय 30 वर्ष आहे. त्याला व्हाट्सअपवर मेसेज आला त्यामध्ये गुगलवर जाऊन वेगवेगळ्या व्यवसायाला रिव्ह्यू देण्याचे काम आहे. ते तुम्ही करा असे सांगण्यात आले होते . सदर कामाचा तुम्हाला घरबसल्या मोबदला मिळेल या आशेने तरुणाने होकार दिल्यानंतर एका टेलिग्राम ग्रुप मध्ये त्याला जॉईन करून घेण्यात आले.

सुरुवातीला काही ठिकाणी या तरुणांनी रिव्ह्यू देखील दिले त्यानंतर पुढील काळात किरकोळ रक्कम त्याला देण्यात आली मात्र पुढील काम हवे असेल तर सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून विश्वास संपादन करून त्याच्याकडून 14 लाख 64 हजार रुपये भरून घेण्यात आले. तब्बल पाच महिने उलटून गेले तरी देखील कुठलाही परतावा मिळाला नाही म्हणून त्याने पोलिसात धाव घेतलेली आहे.

तक्रारदार तरुणांनी म्हटले आहे की , ‘ फसवणूक झाल्याचे समजताच आपण पोलीस ठाण्यात गेलो होतो शेवटी पाठवलेले चार लाख रुपये तरी आपल्याला मिळतील अशी आशा होती मात्र गुन्हा दाखल होण्यातच पाच महिने निघून गेले त्यामुळे अकाउंट फ्रिज करण्यात देखील यश आलेले नसून आयुष्यभराची माझी पुंजी सायबर चोरट्यांनी हिरावून घेतलेली आहे ‘ .


Spread the love