महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार मुंबईत समोर आलेला असून एका विवाह संकेतस्थळावरून मेहुणीसाठी वर म्हणून निवडलेल्या एका व्यक्तीने लग्नापूर्वीच मेडिकल कॉलेजला तुला प्रवेश मिळून देतो असे सांगत साडेआठ लाख रुपयांना गंडवलेले आहे. चुनाभट्टी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार व्यक्ती 48 वर्षीय असून 2021 पासून त्या त्यांच्या पस्तीस वर्षीय मेहुणीसाठी मुलाच्या शोधात होत्या . जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर त्यांनी नाव नोंदणी केली त्यावेळी त्यांना जावेद खान नावाच्या एका व्यक्तीने रिक्वेस्ट पाठवलेली होती. आपण एका शासकीय कॉलेजमध्ये प्राध्यापक आहोत अशी त्याने बतावण केली त्यानंतर त्याने कुटुंबीयांची भेट देखील घेतली मात्र गेल्या वर्षी फिर्यादी यांचा एक नातेवाईक वारला त्यामुळे लग्नाची बोलणी पुढे ढकलण्यात आली.
दरम्यानच्या काळात फेब्रुवारी 2022 मध्ये या मुलीचा नीटचा निकाल लागला आणि त्यानंतर आरोपीने तिला विलेपार्लेच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळून देतो असे आमिष दाखवलेले होते. आरोपीने त्यानंतर टप्प्याटप्प्याने असे करत साडेआठ लाख रुपये तक्रारदार महिला यांच्याकडून घेतले आणि कुठलेही ऍडमिशन त्यांच्या मेहुणीला मिळाले नाही त्यानंतर आपली फसवणूक झाली म्हणून त्यांनी आरोपीला संपर्क केला तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सोबतच त्याने दिलेले चेक देखील बाउंस झाले म्हणून अखेर पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. चुनाभट्टी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.