महाराष्ट्रात एक अजब असा प्रकार समोर आलेला असून नागपूर येथील एका धान्य व्यापाऱ्याने स्वतःच्या पुतण्याला बँकेत भरण्यासाठी तीन लाख रुपये दिले मात्र पुतण्या ती रक्कम दुकानातच विसरला आणि बँकेत गेला. गाडीची डिक्की उघडली त्यावेळी रक्कम दिसली नाही म्हणून त्याने लुटमार झाली असा बनाव करत पोलिसांना फोन केला.
विशेष म्हणजे पोलीस आले त्यावेळी धान्य व्यापाऱ्याने पुतण्या ती रक्कम दुकानातच विसरलेला आहे हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास घेतला . लकडगंज येथील सोनी नावाचे व्यापारी यांचा पुतण्या अंकित सोनी याला तीन लाख रुपये काकांनी बँकेत भरण्यासाठी सांगितलेले होते.
घाईगडबडीत पुतण्या कार्यालयातून निघून गेला आणि बँकेच्या बाहेर गेल्यावर डिक्की उघडली त्यावेळी डिक्कीत पैशाची पिशवी दिसली नाही म्हणून काका संशय घेऊन आता आरडाओरडा करतील म्हणून त्याने दोन चोरांनी आपल्याला लुटलेले आहे असा बनाव केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर काकांशी बोलणे झाले त्यावेळी काकांनी पैशाची पिशवी कार्यालयातच असल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.