चोरीसाठी गेला अन प्राण गमावून बसला , घडली अशी घटना की..

Spread the love

महाराष्ट्रात एक भलताच प्रकार नागपूर इथे समोर आलेला असून एक ज्वेलरी शॉप फोडण्याच्या उद्देशाने मागील बाजूने इमारतीवर एक चोर चढला आणि त्यानंतर खाली पडून त्याचा मृत्यू झाला. नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री आठच्या सुमारास ही घटना घडलेली असून चोरीच्या उद्देशानेच आरोपी इमारतीवर चढला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असलेले निळकंठ अंदरसकर ( वय 60 वर्ष राहणार आदर्श नगर दिघोरी पुडा पुलाजवळ ) हे तहसील पोलीस ठाणे हद्दीत करण कोठारी ज्वेलरी इथे सुरक्षारक्षकाचे काम करत होते . रात्री अचानकपणे कुणीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून म्हणून त्यांनी जाऊन पाहिले त्यावेळी ज्वेलर्सच्या दुकानाच्या मागील बाजूला एक पस्तीस वर्षांचा अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडून होता.

तात्काळ त्यांनी या संदर्भात पोलिसांना खबर केली आणि तात्काळ त्यांनी त्यानंतर मेयो रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केलेले आहे. तहसील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केलेली आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील हा प्रकार कैद झालेला असून चोरीच्या उद्देशानेच तो वरती चढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love