पुण्यात ‘ त्या ‘ बँकेच्या मॅनेजरसोबत तिघांवर गुन्हा दाखल , महिला म्हणतात की..

Spread the love

कर्ज दिल्यानंतर अनेकदा कर्जाच्या वसुलीसाठी बँकेचे अधिकारी तसेच कर्मचारी फोन करतात मात्र अनेकदा समोरील व्यक्तीची मानसिकता त्यांना माहीत नसते आणि त्यातून अनेक धक्कादायक प्रकार देखील पुढे घडतात असाच एक प्रकार पुण्यात समोर आलेला असून धनकवडी येथील राजारामबापू सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्यासोबत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रेमला बजरंग शिंदे ( वय 47 राहणार आंबेगाव बुद्रुक ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून बँकेचे व्यवस्थापक रामभाऊ नामदेव कोंढरे , सोमनाथ कोंढरे यांच्यासोबत तीन जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रेमला यांचे पती बजरंग यांनी राजारामबापू सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले होते . कर्जावर घेतलेला रकमेपेक्षा जास्त रक्कम आरोपी मागत होते तसेच बजरंग यांना त्यांनी शिवीगाळ करत त्रास देखील दिलेला होता अशी फिर्यादी यांचे म्हणणे आहे . आरोपींनी दिलेल्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी दहा नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.

प्रेमला यांनी याप्रकरणी माहिती देताना बजरंग यांनी आपल्या मोबाईलवरून मला संदेश पाठवलेला होता त्यामध्ये राजारामबापू सहकारी बँकेचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे त्यांनी मेसेजमध्ये म्हटलेले होते. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली त्यावेळी सुसाईड नोटमध्ये या स्वरूपाचा उल्लेख मिळालेला असून भारती विद्यापीठ पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.


Spread the love