रहस्यमयरित्या गायब झालेल्या मुंबई येथील बोईसर परिसरातील सदिच्छा साने या विद्यार्थिनीचे गूढ अद्यापही उकलून उकलण्यात पोलिसांना यश आले नाही. एमबीबीएसची विद्यार्थिनी असलेली सदिच्छा साने ही वांद्रे बस स्टैंड येथून गायब झाली ती पुन्हा कोणालाच दिसली नाही. एक महिना होऊन गेला तरी तिचा तपास लागत नसल्याने मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात केली आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबई येथील बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयरित्या गायब झालेली आहे .पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले आहे मात्र तरीही तिची कुठलीच माहिती हाती लागलेली नाही .
ती गायब झाल्याच्या दिवशी तिचा मिथू सिंह या जीवरक्षक असलेल्या व्यक्तीसोबत फोटो आढळून आला मात्र तिचा सेल्फी हा आपल्या फूड स्टॉलच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याचे मिथू सिंह याने पोलिसांना सांगितले आहे. आपण आपल्या दुकानाच्या प्रसिद्धीसाठी असे फोटो घेत असल्याचं सांगत त्याने ६० ते ७० ग्राहकांचे फोटो आपल्याकडे आहेत असेही म्हटले आहे .
जीवरक्षक सिंह याचा बँडस्टॅन्ड येथे मित किचन नावाचा फूड स्टॉल आहे. पहाटेपर्यंत त्याठिकाणी ग्राहक आणि पर्यटकांची वर्दळ असते. या फुड स्टॉलवर येणाऱ्या लोकांचे सेल्फी घेऊन ते सोशल मीडियावर पोस्ट करत आपण फुड स्टॉलच्या प्रसिद्धी करतो, असे मिथू सिंह याने पोलिसांना सांगितले असून तरीही चौकशीसाठी म्हणून वांद्रे पोलिसांनी त्याचे दोन्ही मोबाइल ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी भायखळा येथील हॉस्टेलमधील सदिच्छाची खोली सील केली असून तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. पोलीस अजूनही बँडस्टँड लगतच्या वस्त्यांमध्ये देखील तपास करत आहेत. तिचा शोध घेणे हे पोलिसांपुढे एक आव्हान बनलेले असून लवकरच तिचा शोध लावण्यात यश येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदिच्छा हिला कोणी बॉयफ्रेंड नसल्याचे देखील तिच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलेले आहे मात्र आता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येणार असल्याने शोध लागण्याची चिन्हे आहेत.