तब्बल सतरा जणांना एकाच वेळी जन्मठेप , गावकऱ्यांना संशय आला की..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून ओडीसामध्ये जादूटोण्याच्या संशयातून एका जोडप्याला जिवंत जाळण्यात आलेले होते . अत्यंत धक्कादायक अशा या घटनेत तब्बल 17 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे . जाजपुर जिल्ह्यातील हे प्रकरण असून घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषींना प्रत्येकी दहा हजार रुपये दंडदेखील ठोठावलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सहा जुलै 2020 रोजी कलिंगनगर परिसरातील निमपाली गावात संध्याकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत शैला बालमुज आणि सांबरी बालमुज यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर त्यांच्या घराला आग लावली . जमावाने लावलेल्या आगेत दोन्ही जणांचा होरपळून मृत्यू झालेला होता त्यानंतर ही केस न्यायालयात सुरु होती त्यावेळी तब्बल 17 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे.


Spread the love