शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून तब्बल चार लाख रुपये लुबाडल्याचा प्रकार 18 तारखेला समोर आलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार , लष्करातून निवृत्त असलेल्या या अधिकाऱ्याला ऑगस्ट महिन्यात एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आलेला होता त्यामध्ये एक विवस्त्र अवस्थेतील तरुणी त्याच्यासोबत बोलत होती. अवघ्या काही सेकंदात या अधिकाऱ्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते काढून टाकण्यासाठी सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून चार लाख रुपये उकळले.
गेल्या काही वर्षांपासून अनोळखी व्हिडिओ कॉल आल्यानंतर अशाच पद्धतीने घटना घडत असून व्हिडिओ कॉल स्वीकारल्यानंतर समोरील व्यक्तीचा देखील व्हिडिओ चेहरा त्या व्हिडिओमध्ये समोरील व्यक्तीला जातो आणि त्यानंतर त्याच्या सेक्सटोर्शन नावाचा प्रकार त्याच्यासोबत सुरू होतो. अनोळखी व्यक्तीचे व्हिडिओ कॉल उचलू नये तसेच अनोळखी व्यक्तींना मेसेज किंवा कुठल्याही स्वरूपाचा प्रतिसाद देऊ नये अशी आवाहन असे आवाहन अनेकदा नागरिकांना पोलिसांकडून करण्यात आलेले आहे मात्र तरी देखील अशा घटना रोज समोर येत आहेत.