कांदा ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्याचा अहमदाबादकडे जाणारा ‘ ट्रक ‘ झाला गायब

Spread the love

महाराष्ट्रात कांदा ट्रेडिंग करणाऱ्या एका व्यापाऱ्याला फसवण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरातील नामपुर येथे समोर आलेला असून सुलाई ट्रेडिंग कंपनीचा कांदा भरलेला ट्रक ट्रक ड्रायव्हरने परस्पर लंपास केल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केलेला आहे . जायखेडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा कांदा ट्रकच्या माध्यमातून अहमदाबाद येथील बाजार समितीत भरून पाठवलेला होता . तब्बल 17 टन कांदा ट्रकमध्ये भरला आणि त्यानंतर संबंधित ट्रकचालक दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत अहमदाबाद येथे पोहोचणे अपेक्षित होते मात्र ट्रक पोहोचलाच नाही.

चालक असलेला दिनेशभाई तडवी याला दिवसभर मोबाईलवर फोन केले मात्र त्याने एकही फोन उचलला नाही म्हणून ट्रकचालक ट्रक आणि माल घेऊन लंपास झाल्याच्या शक्यतेतून सुलाई ट्रेडिंगचे मालक यांनी येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. संबंधित ट्रक हा मालेगाव येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीकडून मागविण्यात आलेला होता. ट्रान्सपोर्ट कंपनीने देखील ट्रकचालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापपर्यंत ट्रक आढळून आला नाही .


Spread the love