‘ मोक्ष की राह ‘ संपूर्ण परिवाराला संपवून त्यानंतर डायरीत धक्कादायक दावे

Spread the love

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी लोकांच्या मनावर अजूनही अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा पहायला मिळतो आहे . अशीच एक धक्कादायक घटना हरियाणा इथे उघडकीस आली असून हिसार इथे एका व्यक्तीने चक्क मोक्ष मिळावा म्हणून स्वतःच्या सोबत परिवाराची देखील हत्या केली आहे . सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि देवभोळ्या व्यक्तीला मोक्षप्राप्तीविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले होते त्यातून याने हा धक्कादायक प्रकार केला आहे .

हरियाणातील हिसार भागात राहणारा रमेश वर्मा नावाचा व्यक्ती पेंटिंगची कामे करायचा तसेच जर कुणाच्या घरी साप, अजगर वगैरे प्राणी आले, तर त्यांची सुखरूप सुटका करून तो त्यांना जंगलात सोडून येत असे आणि विशेष म्हणजे या कामाचे तो कोणतेच पैसे देखील घेत नव्हता त्यामुळे परिसरात त्याची चांगली ओळख होती. अनेक लोक त्याच्या या कामाबद्दल त्याचे कौतुकही करत असायचे मात्र अशातच त्याच्या डोक्यात मोक्ष ही संकल्पना घुसली आणि त्याने स्वतःच्या सोबत पूर्ण परिवाराला देखील संपवले.

काही वर्षांपूर्वी त्याला संन्यास घेण्याची इच्छा होती मात्र पत्नी आणि मुलांच्या आग्रहाखातर त्याने ही इच्छा गुंडाळून ठेवली होती आणि त्यानंतर त्याने मोक्ष या गोष्टीवर आपले लक्ष दिले. चोवीस तास त्याच्या डोक्यात मोक्ष हाच विचार घोळत असायचा . आपण मेल्यावर आपल्या परिवाराचे हाल होऊ नयेत म्हणून त्याने सर्वांचा कुदळीने खून केला अन त्यानंतर लाईटचा शॉक घेऊन मरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्याला यश आलं नाही अखेर रस्त्यावर अज्ञात वाहनाखाली उडी मारून त्याने आपलं आयुष्य संपवलं.

जगात राम नसून परलोकातच सौख्य मिळेल अशी त्याला वेडी आशा होती त्यातून त्याने जीव दिला. पोलिसांनी रस्त्यावरून चेंदामेंदा झालेला त्याचा मृतदेह तर घरातून पत्नी आणि मुलांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. रमेशच्या डायरीत त्यांना मोक्ष घेण्याबाबतचे अनेक विचार लिहले असून त्याच्या या मोक्षप्राप्तीच्या नादात पूर्ण परिवार त्याने संपवला असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .


Spread the love