शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी वस्तू दिली नाही . मला दुबईला नेले नाही यावरून भांडण झाल्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला त्यात पत्नीचा पतीचा मृत्यू झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शुक्रवारी हा प्रकार पुण्यातील वानवडी इथे घडलेला असून आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे . निखिल पुष्कराज खन्ना ( वय 36 वर्ष ) असे मयत पतीचे नाव असून त्याची पत्नी रेणुका (वय ३८ ) हिला वानवडी पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे. खन्ना दाम्पत्य हे वानवडी येथील एका सोसायटीत राहत असून निखिल यांचा जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता सोबतच डेव्हलपर म्हणून देखील ते काम करत असायचे. निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता आणि सर्वकाही सुरळीत पहिले काही वर्षे सुरू होते.
सप्टेंबर महिन्यात रेणुका यांचा वाढदिवस होता मात्र आपला वाढदिवस दुबईला साजरा करण्यात यावा अशी त्यांची इच्छा होती . पती निखिल यांनी तिला दुबईला नेले नाही आणि पाच नोव्हेंबरला मनासारखी भेटवस्तू दिली नाही म्हणून तिच्या मनात पतीबद्दल राग निर्माण झाला आणि त्यातून झालेल्या भांडणात तिने पतीचा ठोसा मारून खून केलेला आहे. आरोपी पत्नीला वानवडी पोलिसांनी अटक केलेली आहे .