दुसरं आंतरधर्मीय लग्न आईनं केलं , आईपाठोपाठ मुलीला सावत्र बापानं चक्क..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर येथे समोर आलेले असून आईने आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्यानंतर तिच्या अवघ्या 14 वर्षाच्या मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्ष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे . धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीची आई दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली त्यानंतर सावत्र वडिलांनी या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या घरात विवस्त्र अवस्थेत नाचायला सांगितले आणि त्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. एका सामाजिक संघटनेच्या मदतीने या मुलीने पोलिसांकडे धाव घेतलेली असून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी वडिलांवर बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलगी ही दोन वर्षांची असताना तिच्या आईने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दुसरा आंतरधर्मीय विवाह केला मात्र त्यानंतर आरोपीने आईचा छळ सुरू केला आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. एके दिवशी आईच्या फोनवरून फोन आला म्हणून पीडित मुलगी तिथे पोहचली त्यावेळी घरात सावत्र वडील एकटेच होते आणि घरात सर्वत्र काचेचे तुकडे पडलेले होते मात्र आई आढळून आली नाही. शेजारच्या व्यक्तींनी तुमची आई जखमी अवस्थेत पळून गेलेली आहे इतकेच सांगितले त्यानंतर आठ दिवसांनी या वडिलांनी पीडित मुलीसोबत इतर जणांना घेऊन मुंबईला पलायन केले.

आठ दिवस मुंबईला राहिल्यानंतर तो पुन्हा पुंडलिक नगर परिसरात राहायला आला आणि त्याने या मुलीवर अत्याचार सुरू केले . मुलीच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी आपल्याला सतत दुधात गुंगीचे औषध द्यायचा आणि त्यानंतर अश्लील प्रकार आपल्या सोबत करायचा . मुलीच्या लग्नाचे प्रयत्न देखील सुरू करण्यात आले आले होते मात्र 23 ऑक्टोबर रोजी मुलीने स्वतःचे घर सोडून मैत्रिणीच्या घरी जाऊन सर्व प्रकार कथन केला आणि त्यानंतर सामाजिक संघटनेच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली . पोलिसांनी सुरक्षा समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love