बायको असून बाहेर जमलं , शेवट झाला अत्यंत भयानक..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून स्वतःचे लग्न झालेले असताना देखील गर्लफ्रेंडसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या नवऱ्याला विरोध करत असताना पतीने चक्क स्वतःच्या पत्नीचा खून केलेला आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना असून नवऱ्याने स्वतःची बायको असताना मैत्रीणीसोबत दुसरे लग्न केले म्हणून त्याची पत्नी त्याच्यावर नाराज होती.

उत्तर प्रदेशातील अलीगड येथील ही घटना असून आतरोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मौसमपूर गावात हा प्रकार घडलेला आहे. गालीमुपूर भागामध्ये राहणाऱ्या भगवनादेवी हिचे लग्न मौसमपूर गावातील अजित नावाच्या व्यक्तीसोबत मार्च महिन्यात झालेले होते. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अजित याचे इतरत्र अनैतिक संबंध जुळले.

काही दिवसात पत्नीपर्यंत माहिती आली आणि तिने विरोध केल्यानंतर देखील आरोपी अजित याने भगवनादेवी हिच्यासोबत दुसरे लग्न केले. गावात पंचायत बोलावून आधी त्याला समज देण्यात आली मात्र तरीदेखील त्याचे अनैतिक संबंध बाहेर सुरू होते. 17 नोव्हेंबर रोजी अजित याने भगवानादेवीच्या माहेरी फोन करून ती खोलीचे दार बंद करून रडत असल्याचे सांगितलेले होते . माहेरची मंडळी तिच्या घरी पोहोचली तर खोलीमध्ये तिचा मृतदेहच आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर जोरजोराने ठोसे मारल्याच्या खुणा दिसत असून दिसत असून त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप भगवनादेवी हिच्या माहेरच्या व्यक्तींनी केलेला आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झालेले होते.


Spread the love