पुणे विमानतळ परिसरातून दोन जण ताब्यात , विमानात बसण्याआधीच झाली कारवाई

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून क्रिप्टो करेन्सी आता अर्थात आभासी चलन यामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तब्बल दीड कोटी रुपयांची समोरील व्यक्तीची फसवणूक करण्यात आलेली आहे . परदेशात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला 25 तारखेला विमानतळ परिसरातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , पवनकुमार रघुवीर तत्ववेधी ( वय 35 वर्ष ) आणि पंकज रघुवीर तत्ववेदी ( वय 30 वर्ष दोघेही राहणार राजस्थान ) अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

आरोपी पवनकुमार याने आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष समोरील व्यक्तीला दाखवले आणि त्यानंतर गोड बोलत फिर्यादी यांचा पासवर्ड देखील चोरला त्यानंतर पवन कुमार दुबईला गेला आणि त्यांच्या पासवर्डचा वापर करत तब्बल दीड कोटी रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली त्यावेळी पवनकुमार याने फसवणूक केल्याचे समोर आले .

पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा तो भारतात परतल्याची देखील माहिती मिळाली त्यानंतर पुन्हा तात्काळ तो दुबईला जाणार असल्याची माहिती समजतात सायबर क्राईम विभागाच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला अटक केलेली आहे . प्राथमिक चौकशीत त्याचा भाऊ देखील यात सहभागी असल्याचे आढळून आल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आलेले आहे.


Spread the love