महाराष्ट्रात सध्या टास्क फ्रॉडने धुमाकूळ घातलेला असून सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात यामधून नागरिकांची फसवणूक करत आहेत. असाच एक प्रकार नवी मुंबईत समोर आलेला असून टेलिग्रामच्या माध्यमातून पार्ट टाईम जॉब मिळून देतो असे सांगत मुंबईत एका व्यक्तीची तब्बल 18 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे मात्र नवी मुंबई सायबर पोलिसांनी त्यानंतर तात्काळ कारवाई करत नागपूर इथून या सायबर चोराला ताब्यात घेतलेले आहे .
उपलब्ध माहितीनुसार , सुभाष भरतलाल प्रजापती ( वय 47 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याची बँक खाते गोठवली म्हणून अकरा लाख दहा हजार रुपये हाती लागलेली आहे. आरोपीने फिर्यादी यास जुलै महिन्यामध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून पार्ट टाइम जॉब मिळवून देतो असे सांगत आमिष दाखवलेले होते . टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त फायदा मिळवून देऊ असे सांगत ऑनलाइन पद्धतीने आरोपीने त्यांना रक्कम भरण्यास भाग पाडले . सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने 18 लाख 58 हजार रुपये उकळले होते.
फिर्यादी यांना या संदर्भात कुठलाही नफा आणि मूळ रक्कम देखील देण्यात आली नाही उलटून आणखीन पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यानंतर बँक खाते गोठवलेली होती.
संशयित आरोपी हा नागपूर येथील लष्करी बागेत राहत असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम , पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डे यांच्या पथकाने नागपूर इथे शोध घेत आरोपीला ताब्यात घेतलेले आहे .