महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या ठाण्यात समोर आलेले असून एका महिलेने आपल्या नणंदेचा खून केलेला आहे. नणंद सतत टोमणे मारत होती त्यामुळे ही महिला परेशान झाली आणि अखेर तिने हा प्रकार केला.
उपलब्ध माहितीनुसार , मुक्ता कळसे ( वय 22 वर्ष ) असे मयत नणंद हिचे नाव असून रेणुका बोंद्रे ही तिची भावजयी होती. रेणुका हिच्या दोन्ही बहिणी लक्ष्मी घाडगे आणि अंजना रायपुरे या तिघींनी मिळून रेणुका हिला त्रास देत असलेली मुक्ता ही हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी हा प्रकार घडला आणि मुक्ताईचे डोके जमिनीवर आपटल्यानंतर तिने प्राण गमावले.
मुक्ताईला मारहाण करत असताना तिचे डोके जमिनीवर आपटल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागलेला होता तात्काळ तिला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. मुक्ता ही भावजयीसोबत किरकोळ कारणावरून वाद घालत असायची . रेणुका यांच्याकडे पाहून कुश्चित हसायची त्यामुळे त्यांच्यात याआधी देखील वाद झालेले होते मात्र त्याचा शेवट अत्यंत भयावह असा झालेला आहे.